Contact - Kaladalan Art Gallery, Jalgaon
+91-99227-26728 | +91-98811-38304 |

आमच्या बद्दल

कलादालन आर्ट गॅलरी मध्ये आपले स्वागत आहे

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

नमस्कार मित्रहो कलादालनात आपल हार्दिक स्वागत देताना जन्म आईने सोसावी कळ | मरण सोप व्हावं म्हणून बापाची आयुष्यभर धडपड || असे धडपड करणारे बाबा प्रेमळ आई आणि राम लक्ष्यमणासारखे दोन भाऊ असा आमचा छोटासा परिवार घरपण आहे पण घर नाही. प्रेंम आहे पण हव्यास नाही. कर्तव्य आहे पण अपेक्षा नाही. सरस्वती आहे पण लक्ष्मी नाही. हे सगळं असतांना मला कशाचीच गरज वाटत नाही. मनुष्य परीस्थितिचा दास नव्हे त्याचा निर्माता, नियंत्रक व स्वामी आहे याच संस्कारातून मी वाढले लहानपणापासून कलेविषयी एक वेगळीच आवड होती कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या, लोकरीची पेनवर फुल बनवायची चॉकलेटच्या कागदाची बाहुली, चटई बनवायची आणि शाळेत सर्वात आवडता विषय असेल तर कार्यानुभव मातीची खेळणी, फळे, पक्षी, प्राणी बनवायला मला खूप आवडायचं.

बालपणाचा काळ सुखाचा म्हणत म्हणत हळू हळू जबाबदारीची जाणीव होत गेली. घरात मोठी बहीण म्हणून एक वेगळाच आदर्श निर्माण करायचा अस तेव्हाच ठरवल त्याचवेळी कलेचा रुपांतर एका छंदात झाल आणि छंदाचा रुपांतर शिक्षणासाठी मी पैशात करायचा ठरवलं त्या वेळी बाबांनीही मला साथ दिली आणि कलादालनाची निर्मिती झाली "पूजा गृहउद्योग" म्हणून कलादालन विविध कलाकृतींनी सजू लागलं सर्वप्रथम आईस्क्रीम स्टीकचे घर, होडी, फुलदाणी, वृंदावन, नंतर गोल्डन ट्री, भटजी, विहिणी, पेन बॉक्स, सूप, सौभाग्यअलंकार तसेच बेबी डॉल तर एक नवनिर्मितीच आहे अस म्हणावं लागेल कारण ती आम्हा पाचही जणांच्या कल्पनेचा संगम आहे त्यानंतर वेगवेगळ्या पेन्टिंग फ्रेम, मोती कलश, नारळ, डोली, नऊ बांगडी (चुडा),रांगोळी, पूजेचा ताट, विडापान, केळीचे पान, साखरेचे भांडे, सप्तपदी, शालू खण व इतर अनेक कलाकृती कलादालनात निर्माण होत गेल्या तसेच मौजसाठीचे रुखवंत तयार होऊ लागले आणि त्याच्या जोडीस हलव्याचे दागिन्यांनीही कलादालनात सजू लागले.

ऐवढच नव्हे तर मुळात सुगरण असणारी आमची आई जिच्यामुळे आमच्या घरात अन्नपूर्णेचा वास आहे तिच्या हाताने बनवलेल्या ओल्या रुखवंतामुळे कलादालनाची शोभा अधीकच वाढते ऑरडर प्रमाणे मोदक, अनारसे, करंजी, लाडू, नारळ वड्या,आणि तोडांत टाकल्यावर विरघळेल अशी सांजोरी त्याचबरोबर खुसखुशीत चकली,शेव, चिवडा इ. ती सुंदर बनवते. कलादालनाला सुरू होऊन 10 वर्षे झाली मला MBM पर्यंत शिक्षण घेण्याची हिंमत फक्त कलेमुळे मिळाली कलादालनाची प्रसिद्धी करण्याची वेळ माझ्यावर कधीच नाही आली उलट "सकाळ" दैनिकानेच स्वतःहून माझी मुलाखत घेतली आणि माझ्या जीवनावर एक सुंदर लेख प्रसिद्ध करून माझ्या कलेला वाव देणारा उपक्रम केला त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहीन आज कलादालनातून पाच ते सहा होलसेल दुकानात रुखवताचा माल पोहचवला जातो तसेच तयार रुखवत घेण्यासाठी जळगावतूनच नव्हे तर जिल्याभरातूनही लोक कलादालनात येतात मोठेपणा श्रीमंतीने नव्हे तर ईमानदारी व सज्जनतेमध्ये आहे हेच सूत्र मानून सर्वांना कलादालनाची ओळख व्हावी जिल्याभरातच नाही तर जगभरात कलादालनाची कला पोहोचावी या उददेशाने हा छोटासा प्रयत्न.......
या प्रयत्नात साथ देणारे माझे सर्वस्व माझे आई बाबा आणि सर्वात महत्वाचे माझे गुरुः मा.धनपाल वाघुळदे सर यांना खूप खूप धन्यवाद...........

कलादालन आर्ट गॅलरी :

आपल्या मराठी संस्कृतीत व्यापार हा सणांवर अवलंबून असतो, हे ओळखून आम्ही पूजा साहित्य, दिवाळीच्या वेळी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ, संक्रांतीला तिळाचे लाडू व हलव्याचे दागिने अशा सना नुसार सुविधा देतो.

ग्राहक मागेल ते द्या व ग्राहकाला पाहिजे तसे द्या या तत्वानुसार आम्ही आमच्या दुकानात अनेक नवीन वस्तूंची उपलब्धता सतत करीत असतो.

ग्राहक राजाची अधिकधीक सेवा उत्तम दर्ज्जाच्या वस्तू योग्य दरात देऊन त्या बदल्यात असंख ग्राहकांचे उदंड प्रेम मिळवण हे उद्दिष्ट आहे.

कलादालन आर्ट गॅलरी सेवा

सजावटीच्या कला ह्या कला किंवा हस्तकला संबंधित रचना आणि सुंदर वस्तू उत्पादनात कार्यरत आहेत.

विवाह संस्कार रुखवंत हे लग्नाच्या दिवशी मुली वाल्यान कडून प्रदर्शित करण्यात येतो.

आम्ही चकली, मोतीचूर लाडू, संजो-या करंज्या, अनारस, मसाले, लोणची हे पदार्थ बनवतो.

संक्रांत च्या दिवशी नववधू ला हलव्यांचे दागिने, घालून तिला नटवून सजवून कोड कौतुक करण्याची प्रथा आहे.

कलादालन कौशल्य

सजावट रुखवंत
86%
विवाह संस्कार रुखवंत
95%
खाण्यायोग्य/ओले रुखवंत
83%
हलव्याचे दागिने
90%

भेटा कलादालन टीमला

श्री सुहास मुंडले

मुख्य कार्यकारी अधिकारी

कलादालन फक्त आमचा व्यवसाय नसून, सांस्कृतीक वारसा जपण्यासाठी कलेच्या माध्यमातून परमेश्वराने आम्हाला दिलेली एक संधीच आहे.

राकेश मुंडले

विपणन व्यवस्था प्रमुख

आधुनिक युगात सतत काहीतरी नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो आणि ते करीत असतांना आम्हाला खूप आनंद होतो

रोशन मुंडले

विकसक व्यवस्था प्रमुख

कलादालनातील कलेला संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेरही जगभरात नेण्याचा आमचा मानस आहे.

सौ. माधुरी मुंडले

डिझायनर

या कामातून आम्हाला खूप खूप आनंद मिळतो. म्हणूनच त्यात विविधता आणण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत असतो.